Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात!

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात!
, सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (18:48 IST)
सीजे हाऊस प्रकरणाशी (Ceejay House case) संबंधित राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आज सोमवारी ईडी (ED) कार्यालयात पोहोचले होते. यापूर्वी २०१९ मध्ये सीजे हाऊस प्रकरणी प्रफल्ल पटेल यांची चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, आज पुन्हा एकदा पटेल यांना ईडीने बोलावलं. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा एकेकाळचा जवळचा साथीदार इक्बाल मिर्चीशी संबंधित आर्थिक आणि जमीन व्यवहाराचे प्रकरण आहे.
 
वरळी येथील सीजे हाऊस या इमारतीत दाऊदचा विश्वासू सहकारी इक्बाल मिर्ची याच्या नावाने सदनिका आहे. या इमारतीची पुनर्बांधणी प्रफुल्ल पटेल यांच्या मिलिनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने २००६-०७ साली केली. त्यातील तिसरा आणि चौथा मजला इक्बाल मिर्ची याची पत्नी हजरा इक्बाल हिच्या नावे केला. दरम्यान, यामध्ये ईडीला मनी लाँड्रिंगचा संशय आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली. याप्रकरणी मिर्चीच्या नातेवाईकांना अटक देखील करण्यात आला आहे. तसंच, प्रफुल्ल पटेल यांनी मिर्चीला दिलेली जागा देखील ईडीने जप्त केली.
दरम्यान, २०१९ मध्ये प्रफुल पटेल यांची ईडीने ८ तास चौकशी केली होती. ईडीने केलेल्या मनी लाँड्रिंगच्या आरोप पटेल आणि त्यांच्या कंपनीने फेटाळले होते. मालमत्तेची कागदपत्रे हे स्पष्ट करतात की, हा व्यवहार स्वच्छ आणि पारदर्शक आहे, असा खुलासा पटेल यांनी केला होता. दरम्यान, आज पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात दाखल झाले होते.
 
कागदपत्रांवर सही करायला आलो होत – पटेल
प्रफुल्ल पटेल यांनी ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी प्रतिक्रिया दिली. कागदपत्रांवर सही करायला आलो होतो, असं पटेल यांनी सांगितलं. आमच्या बिल्डिंगमधील त्यांची जागा जप्त करण्यात आली. त्यांची जागा आमच्या बिल्डिंगमध्ये असल्याची पुष्टी करण्यासाठी बोलावलं होतं, असं प्रफुल पटेल यांनी सांगितलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोठी बॅटरी असलेले उत्तम स्मार्टफोन 15 हजार रुपयांपेक्षा कमी मध्ये येतात, लिस्ट पहा