अहमदनगर जिल्ह्याचा संगमनेर तालुक्यात कोठे बुद्रक येथे एकाच दिवशी 100 नागरिकांचा वाढदिवस होता. हा दिवस होता 1 जून. या दिवशी गावातील 81 पुरुष आणि 19 महिलांचा वाढदिवस होता. या दिवशी सामूहिकरित्या 'बड्डे दिन' साजरा करण्यात आला. एका रांगेत बसवून त्यांचे औक्षण करण्यात आले. या निमित्त घरा-घरात वाढदिवस साजरा करण्याऐवजी सामूहिकरित्या वाढदिवस साजरा करण्यात आला. या निमित्त 100 केक कापण्यात आले. बुद्रक हे संगमनेर तालुक्यातील छोटंसं गाव असून त्याची लोकसंख्या 1200 ते 1400 आहे. या गावात 1 जून रोजी गावातील ज्यांचे वाढदिवस या दिवशी आहे त्यांचे एकत्ररित्या वाढदिवस साजरे करण्याचा उपक्रम गावातील सामाजिक मंडळाने सुरु केला.
ज्यांचे वाढदिवस 1 जून रोजी होते त्यांना संध्याकाळी 9 वाजता एकत्ररित्या रांगेत बसवून पुरुषांना फेटे बांधून त्यांचे औक्षण केले. नंतर 100 केक कापून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या निमित्ते केक कापून 81 पुरुष आणि 19 महिलांनी गावात वृक्षसंवर्धनाचे संकल्प घेतले. आणि प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ते एक रोपटं रोपले. या नवीन परंपरा आणि उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.