केंद्र सरकारने उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्यास मंजुरी दिली आहे. तसेच औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही माहिती केंद्र सरकारने उच्च न्यायालयाला दिली.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटने गेल्या वर्षी उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव आणि औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला होता. 16 जुलै 2022 रोजी अधिसूचना काढण्यात आली होती आणि केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
मात्र औरंगाबादच्या नामांतरराबाबत अजून कोणताही निर्णय घेतला गेला नाहीये. प्रक्रिया सुरु असल्याची माहिती महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी प्रभारी मुख्य न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाला दिली.