Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सरकारची मलमपट्टी पुरेशी नाही - छगन भुजबळ

सरकारची मलमपट्टी पुरेशी नाही - छगन भुजबळ
कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाला असताना राज्य सरकारने त्यांना अनुदान जाहीर केलं. पण, ही मदत तुटपुंजी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली आहे.

सरकारने कांद्यासाठी दिलेल्या २०० रुपये अनुदानामधून काय होणार, असा प्रश्न करतानाच २०००मध्ये कांद्यांचे भाव पडले, तेव्हा आघाडी सरकारने ३५० प्रति क्विंटल रुपयाने कांदा खरेदी केला होता, याची आठवण भुजबळ यांनी करून दिली. सरकारची २ रुपयांची मलमपट्टी पुरेशी नसल्याचंही ते म्हणाले.

मंत्र्यांना कांदे फेकून मारा, या राज ठाकरे  यांच्या विधानावर भुजबळांनी मंत्री शेतकऱ्यांजवळ फिरकतच नाहीत, याकडे लक्ष वेधलं. दुसरीकडे, भाजपाशी सत्तेत सोबती असलेल्या शिवसेनेनंही या निर्णयाची अंमलबजावणी नीट आणि वेळेत करा, अशा कानपिचक्या सरकारला दिल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमित राज ठाकरे यांचे लंग्न २७ जानेवारी रोजी,देवीला लग्न पत्रिका अर्पण