Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 15 April 2025
webdunia

'या' शब्दात मुख्यमंत्र्यांनी केले बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

Chief Minister greeted Balasaheb Thackeray
, शनिवार, 23 जानेवारी 2021 (19:38 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित खासदार अरविंद सावंत यांनी देखील पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
 
"छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवा यांनाच जीवन मानणारे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एक महान राष्ट्रभक्त आणि हिंदुत्वाचे तेजस्वी रूप होते. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्याकडून त्यांनी पुरोगामित्व आणि सामान्य माणसाच्या व्यथांना आवाज देण्याची शिकवण घेतली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमाप्रश्न या आंदोलनात बाळासाहेबांनी नेतृत्वाची परिसीमा गाठली. राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकीय आणि समाजकारणात चैतन्य फुलविणारे बाळासाहेब लेखक, पत्रकार, व्यंगचित्रकार, परखड वक्ते, मनस्वी कलाकार असे बहुआयामी होते", असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दांत सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या, हिंदुत्व आणि मराठी माणसाचा बुलंद आवाज असलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आमदार प्रसाद लाड यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट, भेट राजकीय भेट नसल्याचे सांगितले