मुलगा दहशतवादी त्याचे शव मला नको
, गुरूवार, 9 मार्च 2017 (10:14 IST)
पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठाकूरगंज येथे मगंळवारी ठार करण्यात आलेल्या संशयित दहशतवादी सैफुल्लाच्या वडिलांनी त्याचा मृतदेह घेण्यास नकार दिला आहे. देशद्रोही म्हणत एका देशद्रोह्याचा मृतदेह मी घेणार नाही असं ते बोलले आहेत. दुसरीकडे सैफुल्लाच्या नातेवाईकांना त्याच्याबद्दल कळल्यानंतर धक्काच बसला आहे. मात्र दुसरीकडे अटक करण्यात आलेल्या तीन संशयित दहशतवाद्यांच्या पित्यांनी आपली मुलं निर्दोष असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे देशावरील त्या पित्याचे प्रेम दिसून येते तर खोट्या गोष्टीना भुलून देशविरुद्ध कारवाई करणारया सर्व तरुणांना हा एक संदेश आहे अस म्हणता येईल.
पुढील लेख