Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दाभोलकर हत्या प्रकरण तपास कधी पूर्ण करणार

दाभोलकर हत्या प्रकरण तपास कधी पूर्ण करणार
, गुरूवार, 24 नोव्हेंबर 2016 (09:51 IST)
महाराष्ट्रातील  विचारवंत आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी काम करणारे थोर समाजसेवक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद  पानसरे हत्येप्रकरणी मुंबई हायकोर्टाने तपास करणारया सर्वाना चांगलेच खडसावले आहे..  यंत्रणा हत्येच्या तपासात चालढकल करुन कोर्टाचा वेळ वाया घालवत असल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे . तुम्ही तपास कधी संपवणार ? असा थेट सवाल विचारत कोर्टाने सीबीआयला फटकारून काढलं आहे . किती दिवस तुम्ही हा वेळ मारून नेणार आहात. तपास करताय मग दिसत का नाही असा खडा सवाल कोर्टाने विचारला आहे.
 
नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे प्रकरणी मुंबई हायकोर्टाने  सीबीआयला चांगलंच कान टोचले आहेत. तुम्ही समजता असा  दाभोलकर खटला हा खटला एका कुटुंबापुरता मर्यादित नाही. उद्या त्या जागी कोणीही असू शकतं. हे फक्त या कुटुंबियांसाठी आहे असं नाही. अशा प्रवृत्तींना रोखणं आवश्यक आहे. हत्येचा तपासासाठी कोर्टानं खूप वेळ दिलाय. आता आणखी वेळ देणार नाही असंही कोर्टाने सुनावलं आहे.तुम्ही तपास केला नाही तर इतर मार्ग विचार करावा लागेल असे कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे आता तरी कोर्टच्या  दबावात तरी तपास यंत्रणा काम करतील असे चित्र आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता रुग्णालयावर होणार गुन्हे दाखल