Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ओमिक्रॉन विषाणू संसर्गावर मात करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितला हा पर्याय

ओमिक्रॉन विषाणू संसर्गावर मात करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितला हा पर्याय
, शनिवार, 11 डिसेंबर 2021 (21:13 IST)
नवा विषाणू ओमिक्रॉनमुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील लसीकरणाला अधिकाधिक गती द्यावी, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, एन.जी.ओ, साखर कारखाने यांचा सहभाग घ्यावा,
असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. लातूर जिल्हा वार्षिक नियोजन आणि कोरोना संसर्ग वाढू नये यासाठीचे निर्बंध आढावा बैठक नियोजन भवन येथे आयोजित केली होती.
त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीला राज्यमंत्री संजय बनसोडे, जि. प. अध्यक्ष राहुल केंद्रे, आ. धीरज देशमुख, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ.अभिमन्यू पवार, आ. बाबासाहेब पाटील,
महापौर विक्रांत गोजमागुंडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा नियोजनचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
नवा विषाणू ओमायक्रॉनचा संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यात अधिकाधिक लसीकरण करून घ्यावे, पहिला डोस 75 टक्के नागरिकांनी जिल्ह्यात घेतला आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी आहे.
जिल्ह्यातील जनतेला विनंती की आपला जिल्हा सुरक्षित ठेवायचा असेल मास्क वापरावा तसेच 100 टक्के लसीकरण करून घ्यावे. हे लसीकरण वाढविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, एन.जी. ओ, विविध कंपन्या, साखर कारखाने यांनीही यात मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
कोरोनामुळे विकास कामावर परिणाम झाला असून या आर्थिक वर्षातील निधीला तात्काळ प्रशासकीय मान्यता द्यावी. संबंधित विभागानी हा निधी विकास कामासाठी करावा, अखर्चीत निधी 31 मार्च नंतर परत करायची वेळ येऊ देऊ नका अशा सूचनाही प्रशासनाला उपमुख्यमंत्री यांनी यावेळी दिल्या.
तसेच ज्या ज्या आरोग्य सुविधा उभ्या केल्या आहेत, त्या सुविधा उत्तम चालाव्यात आणि नागरिकांना त्याचा लाभ व्हावा यासाठी आरोग्य विभागांनी काम करावे अशा सूचना दिल्या.
लातूर शहरात नवीन रुग्णालय उभं करण्यासाठी लागणाऱ्या जागे बद्दल प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकी समोर ठेवावा, शासन त्याला मान्यता देईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
सर्व हॉस्पिटलचे फायर ऑडिट करून घ्यावे, त्यात ज्या त्रुटी दाखविल्या आहेत त्या त्रुटी काढतांना गुणवत्तापूर्ण काम करावे असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले हे काम तात्काळ करून घ्यावे.
आपली एक चूक दुर्घटनेसाठी कारणीभूत ठरू नये यासाठी सर्व यंत्रणानी काम कराण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली. रमाई आवास योजनेसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही तसेच पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र रोहित्र बसविण्यासाठीही उपमुख्यमंत्र्यांनी अनुकलता दर्शविली आहे.लातूर मध्ये दिव्यांग उपचारासाठी केलेले केंद्र राज्यातील इतर जिल्ह्यातही करणार जिल्ह्यातील बालकांच्या दिव्यांगावर मात करण्यासाठी त्यांच्यावर उपचार व्हावेत, म्हणून त्यासाठी लागणारे उपकारण आणि त्यात बालकांचे मनोरंजन व्हावे म्हणून तसे पूरक चित्रं काढले आहेत. हे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी आणि जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी सादरीकरणातून दाखविल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा उपक्रम अतिशय उपयुक्त असून आपण इतर जिल्ह्यातही करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सरकारमध्ये काम करण्याची इच्छाशक्तीच दिसत नाही -अमित ठाकरे