Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिवाळीपूर्वी मागण्या मान्य करा अन्यथा सत्ताधाऱ्यांना घेराव घालू - आ. ख्वाजा बेग

दिवाळीपूर्वी मागण्या मान्य करा अन्यथा सत्ताधाऱ्यांना घेराव घालू - आ. ख्वाजा बेग
, शनिवार, 3 नोव्हेंबर 2018 (16:32 IST)
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने २९ ऑक्टोबर ते १ नोंहेबर २०१८ या कालावधीत पायी चालत ४५ किमी जवाब दो पदयात्रा काढून या बहिऱ्या सरकारला जाब विचारला. या दरम्यान सर्वसामान्य जनतेचे प्रश्न उपस्थित करत मागण्या मान्य करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.
 
पदयात्रेच्या माध्यमातून या बहिऱ्या सरकारला जागे करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. दिवाळीच्या आत जर आंदोलनकर्त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाहीत तर सत्ताधाऱ्यांना दिसतील तिथे घेराव घालू, असा इशारा जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग  यांनी दिला. या निवेदनानुसार आर्थिक डबघाईस आलेला शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत आहे. बेरोजगारांच्या हाताला काम नाही, जीएसटी व नोटाबंदीमुळे उद्योग, व्यापारी वर्ग अडचणीत आला आहे. शासनाच्या रोज बदलत्या निर्णयांमुळे नोकरदार परेशान आहेत. याबाबत अनेक आंदोलने करूनही सरकारला जाग आली नाही त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक आणि महिला वर्ग यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन पदयात्रा काढली. यात विविध प्रश्नांचा भडिमार सरकारवर करत 'जवाब दो' पदयात्रा आंदोलनातून करण्यात आले.
 
यावेळी आमदार विद्या चव्हाण, माजी आमदार संदीप बाजोरीया, प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, प्रदेश सरचिटणीस वसंतराव घुईखेडकर, प्रदेश सरचिटणीस ययाती नाईक, माजी जि.प.उपाध्यक्ष वर्षा निकम, प्रदेश संघटन सचिव उत्तमराव शेळके,जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चांगले सरकार असेल तर शिवसेना भाजपा सोबत - उद्धव ठाकरे