Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

याला म्हणतात उंटाच्या तोंडात जिरे; फडणवीसांची प्रतिक्रिया

devendra fadnavis
, सोमवार, 23 मे 2022 (09:00 IST)
केंद्र सरकारनंतर आता राज्य सरकारने देखील पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धित करात कपात केली. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. यात फडणवीसांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
 
हा निर्णय म्हणजे सामान्य माणसाची क्रूर थट्टा असल्याचा आरोप करत त्यांनी किमान 10 टक्के भार घेण्याची मागणी केली. 
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "इंधन दर कपात करताना केंद्र सरकारने 2,20,000 कोटी रुपयांचा आर्थिक भार घेतला आहे. असं असताना किमान महाराष्ट्राच्या आर्थिक लौकिकाला साजेशी घोषणा अपेक्षित होती. देशाच्या जीडीपीमध्ये आपला वाटा 15 टक्के आहे. इंधन दर कपातीत राज्य सरकारने किमान 10 टक्के तरी भार घ्यायचा होता. पण नाही! याला म्हणतात 'उंटाच्या तोंडात जिरे'!"
 
"अन्य राज्य सरकारे 7 ते 10 रुपये दिलासा देत असताना महाराष्ट्रासारख्या राज्याने 1.5 आणि 2 रुपये दर कमी करणे, ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत असताना मनाचा थोडा मोठेपणा दाखविला असता तर बरे झाले असते," असंही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.
 
राज्य शासनाने 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इंधनावरील दर कपात ही निव्वळ धुळफेक'