Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जिल्हास्तरावर असणारी डायलिसीसची सुविधा आता तालुकास्तरावर देखील उपलब्ध

जिल्हास्तरावर असणारी डायलिसीसची  सुविधा आता तालुकास्तरावर देखील उपलब्ध
, शुक्रवार, 12 मार्च 2021 (15:59 IST)
राज्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्हास्तरावर असणारी डायलिसीसची सुविधा आता तालुकास्तरावर देखील उपलब्ध करून देण्यात येत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
 
जागतिक मुत्रपिंड दिनानिमित्त मुंबईत ॲपेक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून दूरदृष्यप्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात टोपे बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
 
ग्रामीण भागात परवडणाऱ्या किंमतीत डायलिसीस सुविधा उपलब्ध होण्यासाठी, पेरिटोनिअल डायलिसीसच्या वापराबाबत ॲपेक्स फाऊंडेशननं पुढाकार घेऊन शासनाला सहकार्य करण्याचं आवाहन, आरोग्यमंत्र्यांनी केलं. कोविड काळात डॉक्टर्स, नर्स, तंत्रज्ञांनी कोविड रुग्णांना डायलिसीसची सेवा दिली, या सर्वांनी केलेलं काम लक्षणीय असून, त्यांना आपण सलाम करतो, असं टोपे म्हणाले.
 
राज्याच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये मुत्रपिंड प्रत्यारोपणाचा समावेश असून त्यासाठीची रक्कम वाढवण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचं टोपे यांनी सांगितलं. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोठी बातमी, पुढील महिन्यात महाग होऊ शकतं टर्म इंश्योरेंस, जाणून घ्या का आवश्यक आहे टर्म इंश्योरेंस