Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मिनी विधानसभेचा अनपेक्षित निकाल

मिनी विधानसभेचा अनपेक्षित निकाल
, सोमवार, 28 नोव्हेंबर 2016 (15:05 IST)
राज्यातील 147 नगरपालिका आणि 18 नगरपंचायत निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे अवघ्या काही तासात स्पष्ट होत आहे. विविध नगरपालिकांच्या निकालाला सुरुवात झाली आहे.अनेक ठिकाणी अनपेक्षित असे भाजपा पडला असून शिवसेना आघाडीवर आहे. तर काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपले सिट राखत आहे. त्यामुळे मिनी विधानसभा म्हणून ओळख असलेल्या निवडणुका मोठा परिनाम करणार हे नक्की. 
 
राज्यात प्रतिष्ठेची असलेल्या बीड जिल्ह्यातील निवडणूकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात ही थेट प्रतिष्ठेची लढाई होती. पण पंकजा मुंडे यांना परळी पालिकेच्या निवडणूकीत धक्का बसला आहे. ३३ पैकी २७ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर आहेत.
 
सातारा नगरपालिकेत सातारा विकास आघाडीचे खासदार उद्यनराजे भोसले यांची सत्ता आली आहे.या निवडणुती सातारा विकास आघाडीला 22 जागांवर विजय मिळालाय. तर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीला 12 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपला 6 जागांवर विजय मिळवलाय. सातारा नगरपालिकेत नराध्यक्षपदी माधवी कदम यांची निवड झाली आहे.
 
सत्ताधारी भाजपला या निवडणुकांमध्ये अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही.   या निकालांमध्ये कोकणात राणे कुटुंबियांनी केलेले जोरदार कमबॅक लक्ष वेधून घेताना दिसत आहे. कोकणातील सावंतवाडी, देवगड आणि दापोलीत काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. गेल्या निवडणुकीत सावंतवाडी नगरपरिषदेत राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या दीपक केसरकर यांनी सर्व १७ जागा जिंकल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसने राणे यांच्या नेतृत्त्वाखाली ८जागा मिळवल्या आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लहान कोंबड्याने घातले स्वेटर, पहा व्हिडिओ