Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात; वन विभागाची मोठी कारवाई

vishal garh
, शुक्रवार, 9 डिसेंबर 2022 (07:58 IST)
संभाजी राजे छत्रपती  यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी झलेल्या बैठकीनंतर जिल्हा प्रशासनाला जाग आली असून प्रशासनाकडून किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याला सुरुवात केली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावरील अतीक्रमण काढण्यासाठी काल 7 तारखेला जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेऊन विशाळगडावरिल परिस्थिती मांडली होती. त्याला प्रतिसाद म्हणून आज व न विभागाकडून आज मोठी कारवाई करण्यात आली. गडाच्या पायथ्याला असणारे शेड्स वन विभागाकडून उध्वस्त करण्यात आले असून संपूर्ण कारवाईनंतरच आंदोलन मागे घतले जाईल अशी शिवप्रेमींनी भूमिका घतली आहे.
वनविभागाचे पथक गुरूवार 8 डिसेंबर रोजी सकाळीच गडावर दाखल झाले. वनविभागाच्या हद्दीतील बुरजाजवळील दस्तगिर इस्माईल मुजावर यांचे तर पायथ्याचे पांडूरंग धोंडू धुमक यांचे थंड पेयाचे दुकान जमिनदोस्त केले. पक्क्या बांधकामाचे नुकसान होवू नये म्हणून पायथ्याच्या एक एकरातील वीस जणांनी आपली अतिक्रमणे पंधरा दिवसात काढून घ्यावीत. असा अल्टीमेटम जिल्हा उपवनसंरक्षक जी.गुरूप्रसाद यांनी अतिक्रमणधारकांची बैठक घेऊन दिला. तातडीने झालेल्या या कारवाईमुळे गडावर अतिक्रमणधारकाचे धाबे दणाणले आहेत.
विशाळगडावर चाँद इमारत व पुढील बुरूज परीसरात गट नं१०८२(४९ब) परीसरात ऐंशी एकर जमिन आहे. तर पायथ्याशी १०८१ गटातील एक एकरात पार्कींग, हाँटेल, कोल्ड्रिंक्सची दुकाने थाटली आहेत.प्रत्यक्षात वीस मांडव दिसतात पण एकावन्न लोकांनी पायथ्याला जागा आरक्षित केल्याची माहिती माजी सरपंच संजय पाटील यांनी दिली.ग्रामपंचायतीने ही परवानगी कशी दिली यांचे आश्चर्य व्यक्त केले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

याला कारणीभूत देवेंद्रजींचे फुटीरतावादी राजकारण आहे-सुषमा अंधारे