Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत व्हॉट्सॲप वर मेसेज आला इंजिनीयरने गमावले 62 लाख रुपये

मुंबईत व्हॉट्सॲप वर मेसेज आला इंजिनीयरने गमावले 62 लाख रुपये
, शुक्रवार, 3 जानेवारी 2025 (17:53 IST)
सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकरण वाढत आहे. लोकांची एक चूक त्यांना महागात पडत आहे. चांगला परतावाचे आमिष दाखवून एका अभियंत्याची फसवणूक केली आहे. आणि लोभापोटी पीडित ने 62 लाख रुपये गमावले आहे. 

हे प्रकरण आहे ठाण्याचे. एका महिलेने एका अभियंत्याला व्हॉट्सॲप वर मेसेज केला आणि स्वतःची ओळख अनाया म्हणून दिली. नंतर महिलेने गुंतवणूक केल्यावर चांगला परतावा मिळेल असे सांगून अभियंत्याला फसवले आणि शेअर ट्रेंडिंग मध्ये कमी वेळात चांगला फायदा होतो. असे आश्वासन दिले.

महिलेच्या म्हणण्याला बळी पडून त्याने दोन महिन्यांत 62 लाख रुपये गुंतवले. नंतर त्याला परतावा मिळाला नाही की कोणताही फायदा झाला नाही.महिलेशी फोनवर संपर्क केलं असता महिला देखील गायब झाली. पीडित अभियंत्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले नंतर त्याने बुधवारी कळवा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. हे प्रकरण सप्टेंबर ते नोव्हेंबर 2024 दरम्यानचे आहे. 
या प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली असून महिलेने पीडित अभियंत्याची फसवणूक कशी केली याचा शोध पोलीस करत आहे. 
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चालत्या ट्रेनमधील एका प्रवाशाला बेदम मारहाण, प्रवाशाचा मृत्यू