Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनानंतर राज्यावर गारपीटीचे संकट

कोरोनानंतर राज्यावर गारपीटीचे संकट
, मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (18:17 IST)
28 ते 29 डिसेंबर या कालावधीत मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किरकोळ वाढ झाली आहे.
कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट नोंदवण्यात आली आहे. तसेच राज्यातल्या अनेक भागांत गारपीटीची शक्यता मुंबई हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच  विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर,सातारा, सांगली,सोलापूर तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणीआणि हिंगोली जिल्ह्यात गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

PM मोदींच्या सुरक्षा ताफ्यात नवीन Mercedes-Maybach 650 समाविष्ट, जाणून घ्या त्याची सर्व वैशिष्ट्ये