Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जय शहाने सचिन तेंडुलकरला क्रिकेट शिकवलं आहे का?-उद्धव ठाकरें

uddhav thackeray
, बुधवार, 6 मार्च 2024 (09:06 IST)
लोकसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा आणि टप्पे कधीही जाहीर होऊ शकतात. अशात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंवर घराणेशाहीचा आरोप केला होता. त्यामध्ये अमित शहा असे म्हणाले होते की उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे. त्या विधानाचा आता उद्धव ठाकरेंनी जोरदार समाचार घेतला आहे. जय शहा याने सचिन आणि विराटला क्रिकेट शिकवलं आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
 
‘‘इंडिया ही आघाडी वगैरे काही नाही. ही आघाडी म्हणजे काही सत्तालोलुप पक्षांचं एकत्र येणं आहे. या लोकांना आपल्या मुलांना, पुतण्याला, भाच्याला मुख्यमंत्री किंवा मंत्री किंवा पंतप्रधान बनवायचं आहे. राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत हे सोनिया गांधी यांचं लक्ष्य आहे. तर उद्धव ठाकरेंना त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असे वाटत आहे. स्टॅलिन यांनाही त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असे वाटत आहे. ममता बॅनर्जी यांना त्यांच्या भाचीला सत्तेत आणायचं आहे. यात आघाडी कुठे आहे? या लोकांना आपल्या कुटुंबाचं कल्याण करायचं आहे.
 
‘अमित शहा तोंड वर करून बोललात, उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे. बरं करायचं आहे मला मुख्यमंत्री. पण यांनी मतं दिली तर तो होईल ना. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद म्हणजे बीसीसीआयचं अध्यक्षपद नाही. अमित शहा महाराष्ट्रात येत आहेत. त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं जय शहाचं क्रिकेटमधलं योगदान काय? सचिन तेंडुलकरला, विराट कोहलीला त्याने शिकवलंय का? त्याचा काय संबंध आहे क्रिकेटशी? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परिवारवादातून चालणारे विरोधी पक्ष हे लोकशाही मजबूत करू शकतात का? --अमित शाह