Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कापशीच कोल्हापूरी पायताण बसल की कळेल, आव्हाडांच्या टीकेला हसन मुश्रीफांचं प्रत्युत्तर

Webdunia
शनिवार, 26 ऑगस्ट 2023 (21:37 IST)
कोल्हापुरात दसरा चौकात स्वाभिमानी निष्ठावंतांची निर्धार सभा पार पाडली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अर्ध्या तासाच्या भाषणात केंद्र व राज्य सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रवादीतील फुटीरांवर टीकास्त्र सोडत भाजप सरकारवर हल्लाबोल केला. तसेच या सभेत नाव न घेता मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली. याचबरोबर आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला. उस्तादना भेटायला वस्ताद आला आहे. आमचा वस्ताद भयंकर आहे. कुस्ती त्याच्याशी आहे म्हटल्यावर समोरच्याची घाबरगुंडी उडते. गद्दारी काही लोकांच्या रक्तात असून, अशा सापांना चेचण्यासाठी पायताणाचा वापर करावा लागेल अशी टीका जितेंद्र आव्हा़ड  यांनी केली होती. याला प्रत्यूत्तर आज राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कोल्हापूरमध्ये कापशीच चप्पल प्रसिद्ध आहे, ते कर्कर वाजत. ते जेव्हा बसेल तेव्हा कळेल, असा टोला जितेंद्र आव्हाड यांना लगावला.
 
यावेळी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, आम्ही अजितदादांसोबत का गेलो हे याआधी सांगितलं आहे. आमचा निर्णय पक्षाच्या विस्तारासाठी आहे. हा सामूहिक निर्णय आहे. याबाबतच्या चर्चा आमच्या दैवताबरोबर झाल्या होत्या. जितेंद्र आव्हाड यांनी पवारांवर काय जादू केली मला माहित नाही. त्यांनी ठाण्यामध्ये संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष संपवला.

त्यांनी अशी भाषा बोलायला नको होती. एकनाथ शिंदे गुहाटीला गेले त्यावेळी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी सत्तेत सहभागी होण्यासाठी पाठिंबाचे पत्र दिलं होतं. त्यावर जितेंद्र आव्हाड यांची देखील सही होती. यावेळी गृहनिर्माण खातं आव्हाड हृदयाला कवटाळून बसले. त्यावेळी कुठे गेला होता तुझा धर्म. कोल्हापूरमध्ये कापशीच चप्पल प्रसिद्ध चप्पल आहे ते कर्कर वाजत ते जेव्हा बसेल तेव्हा कळेल, असा टोलाही लगावला.
 
काल शरद पवार यांची सभा दै. तरूण भारत संवाद या सोशल प्लॅटफॉर्मवरून लाईव्ह सुरु होती. ही सभा हसन मुश्रीफ यांनी लाईव्ह पाहिली याचे स्क्रिन शॉट काल व्हायरल झाले. यासंदर्भात बोलताना मुश्रीफ म्हणाले, माझ्या सोशल अकाउंटवरून ही सभा माझ्या टीमने पाहिली मी कलेक्टर ऑफिसमध्ये मीटिंगमध्ये असल्याचे स्पष्ट केले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

पुढील लेख
Show comments