Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नमाज अदा करताना हार्ट अटॅक

नमाज अदा करताना हार्ट अटॅक
, शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (13:49 IST)
नागपूर. जाफरनगर येथील बडी मशिदीत नमाजाच्या वेळी एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला व उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. हमीद खान, इंद्रनगर, अकोट निवासी असे मृताचे नाव आहे.  
 
 मिळालेल्या माहितीनुसार, हमीद खान उपचारासाठी नागपुरात आले होते आणि भावासोबत येथे राहत होते. ते बडी मशिदीत पोहोचले आणि मागच्या रांगेत उभे राहून नमाज अदा करू लागले. यादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र प्राथमिक तपासणीनंतरच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.  

Edited by : Smita Joshi

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केदारनाथजवळ बर्फाचा डोंगर घसरल्याने घबराट पसरली आहे