Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हृदयद्रावक घटना- कार चालवतांना आला हृदयविकाराचा झटका.. चालकाचा मृत्यू

हृदयद्रावक घटना- कार चालवतांना आला हृदयविकाराचा झटका.. चालकाचा मृत्यू
, मंगळवार, 25 जानेवारी 2022 (08:21 IST)
नाशिकच्या सिन्नर-शिर्डी महामार्गावर कार चालकाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा  मृत्यू झाल्याची घटना घडलीये.

खोपडीहून गुजरातकडे जात असताना ही घटना घडली आहे.संतोष लहानू कोकरकर (वय 29 वर्ष) रा. धामणगाव, ता. अकोले असे त्यांचे नाव आहे.

सध्या ते गुजरात येथे कामाला होते. काही दिवसापूर्वी ते सिन्नर तालुक्यातील खोपडी येथे आपल्या सासूरवाडीला आले होते. काल (दि. २४ जानेवारी) ला सकाळी 7 वाजता ते आपल्या कारने (G J 21/ A A 1155) गुजरातच्या दिशेने रवाना झाले होते.
 
मात्र सिन्नर शहराजवळील वावी वेस परिसरात आले असता त्यांना अचानक छातीत वेदना होऊ लागल्या. त्रास जास्त होत असल्याने त्यांनी कार रस्त्याच्या कडेला उभी केली. कारमध्ये सोबत कोणीही नसल्याने त्यांना उपचाराकरिता रुग्णालयातसुद्धा दाखल करता आले नाही. तर ह्रदयविकाराचा झटका तीव्र असल्याने त्यांचा कारमध्येच मृत्यू झाला.
 
बराच वेळ कार रस्त्याच्या कडेला उभी असल्याचे परिसरातील नागरिकांनी बघितले. कार जवळ गेल्यावर मात्र ते सीटवरच पडलेले दिसून आले. याबाबत सिन्नर पोलिसांना कळविण्यात आले. तत्काळ पोलीस ठाण्यातील पोलिस उपनिरिक्षक सुदर्शन आवारी आणि त्यांची टीम घटना स्थळी दाखल झाले. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना कारबाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. शासकीय रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईंकांच्या ताब्यात देण्यात आला.
 
सिन्नर शिर्डी ह्या रस्त्यावर नेहमी वाहनांची गर्दी असते. संतोष यांनी प्रसंगावधान दाखल्याने अनेक जणांचे प्राण वाचले आहेत. संतोष यांनी कार रस्त्याच्या बाजूला लावली नसती तर मागून येणारी कार संतोष यांच्या कारला आदळून मोठा अपघात झाला असता!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऑनलाईन शिक्षणसाठी मोबाईल नसल्यामुळे विद्यार्थींनीने केली आत्महत्या