सध्या राज्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. सलग आठवडाभर पाऊस आल्याने शेतीपिकांना फायदा झाला असून शेतकरींना दिलासा मिळाला आहे. धरणे भरले आहे. नदीपात्रात पाणी ओसंडून वाहत आहे. रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गेल्या दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.आता येत्या 48 तासांत हवामान खात्यांकडून राज्यात पुन्हा पावसाची दमदार हजेरी लागणार असा इशारा दिला आहे.
आज सोमवार पासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळणार अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यांत पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
कोल्हापुरात सतत पावसामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ आली आहे. पावसामुळे या नदीपात्रात अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.
येत्या 48 तासांतमराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळणार तर विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावणार अशी शक्यता आहे.गडचिरोली, चंद्रपूर, आणि गोंदिया जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
आज विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात देखील आज मेघसरी बरसणार अशी शक्यता व्यक्त केली आहे.