घाटकोपर मध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना ताजी असताना पुण्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांचा गोंधळ उडाला. शनिवारी संध्याकाळी पुणे- सोलापूर महामार्गावर असणार एक होर्डिंग कोसळून दोघे जण जखमी झाले तर एका घोड्याला मार लागला आहे.
सदर घटना लोणी काळभोर परिसरातील कवडीपाट टोलनाक्याजवळ असलेल्या गुलमोहर लॉन्स येथे दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.सोलापूर महामार्गाला लागून असलेल्या गुलमोहर लॉन्स मध्ये एक कार्यक्रम होता.
या ठिकाणी पुण्यातील बँड पथक आले होते. वाजंत्री वाजवत बसलेले होते आणि घोडा झाडाजवळ बांधला होता. सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे महामार्गालगत धोकादायक पद्धतीने बांधलेले मोठे होर्डिंग कोसळून पडले या होर्डिंगच्या खाली भरत साबळे आणि अक्षय हे सापडले.या घटनेत दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. भरत साबळे आणि अक्षय कोरवी दोघेही राहणारे पुणे जखमी झाले आहे.
मुंबईच्या घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातानंतर राज्यभरातील होर्डिंग बाबत आवाज उठवला जात असून अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा वर आला आहे. वारंवार सांगून देखील प्रशासन यावर कोणतीही कारवाई करत नसल्याचं समोर येत आहे.