Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

युपीमध्ये जे घडलं ते खरं की खोटं, हे सुद्धा माहीत नाही, मग हा बंद कशासाठी?

युपीमध्ये जे घडलं ते खरं की खोटं, हे सुद्धा माहीत नाही, मग हा बंद कशासाठी?
, गुरूवार, 7 ऑक्टोबर 2021 (08:03 IST)
लखीमपूर खेरीच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने येत्या 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.  त्यानंतर, भाजपाने बंदवरुन राज्य सरकार आणि महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे. माजी खासदार निलेश राणे आणि आमदार अतुल भातखळकर यांनी सवाल उपस्थित केले आहेत. युपीमध्ये जे घडलं ते खरं की खोटं, हे सुद्धा माहीत नाही, मग हा बंद कशासाठी? असा सवाल निलेश राणेंनी विचारला आहे. 
अतुल भातखळकर यांनीही ट्विट करुन ठाकरे सरकारला प्रश्न केला आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही टीका केली आहे. तसेच, एनसीबीच्या कारवाईविरोधात हा बंद आहे का?, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुन्हा एकदा भाजपावरच जनतेनं विश्वास दाखवला : फडणवीस