एका जाहीर कार्यक्रमात मी ब्राह्मणाला मुख्यमंत्रीपद दान दिलं,” असं विधान खडसे यांनी केलं आहे. मुक्ताईनगर येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. उपस्थितांसमोर बोलताना खडसे म्हणाले, “नाथाभाऊ इतका दिलदार आहे की, आम्हाला सांगितलं गेलं नाथाभाऊ तू आता घरी बैस मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. नाथाभाऊवर मुक्ताबाईचा आशिर्वाद आहे, त्यामुळे मी म्हटलं घे रे तू भी क्या याद करेगा. मी भल्या भल्यांना दान देतो तर ब्राह्मणांना दान द्यायला काय हरकत आहे,” अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
आपण भाजपा का सोडली याच कारण सांगताना खडसे म्हणाले, “भाजपानं एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्यांना बाजूला केलं. एका व्यक्तीमुळे सरकारचं वाटोळं झालं. या अशा लोकांमुळे मला भाजपा सोडवी लागली. जिथे आपलेच गद्दार होतात त्या घरात राहून काय उपयोग आहे. यांच्यापेक्षा दिलदार शत्रू बरा. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा.”