Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लोणावळा स्थानकावर मोठा अपघात, इंदूर एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले

लोणावळा स्थानकावर मोठा अपघात, इंदूर एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले
, सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (10:58 IST)
इंदूर- दौंड एक्सप्रेसचे दोन डबे लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ घसरल्याची घटना घडली आहे. यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळित झाली आहे. ही घटना सकाळी सुमारे आठ वाजता घडली. रेल्वे प्रशासनाकडून घसरलेले डबे पुन्हा रूळावर आणण्याचे काम युध्दपातळीवर सुरू झाले आहे.
 
ही गाडी पुण्याला लागून दौंड येथून इंदूरला निघाली होती. 22 बोगींच्या या ट्रेनपैकी शेवटच्या दोन बोगी रुळावरून घसरल्या आहेत. मात्र, आतापर्यंत या अपघातात कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. त्याचबरोबर घटनेची माहिती मिळताच रेल्वे रिलीफ व्हॅन घटनास्थळी पोहोचली आहे. या मार्गावरून जाणाऱ्या इतर अनेक गाड्या या अपघातामुळे प्रभावित झाल्या आहेत. रेल्वे आता जीर्णोद्धाराच्या कामात व्यस्त आहे.
 
गाडीचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर ही घटना घडली आहे. दरम्यान, सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. 
 
इंदूर एक्सप्रेस सकाळी सात वाजून ५७ वाजता मिनिटांनी लोणावळा रेल्वे स्थानकात दाखल होत होती. त्यावेळी मागचे दोन डबे (जनरल) रुळावरून घसरले. एक्स्प्रेसचे दोन डबे रूळावरुन घसरल्यानंतर डबे पुन्हा रुळावर आणण्यासाठी रेल्वेचे कर्मचारी युद्ध पातळीवर काम करत आहेत. या घटनेमुळं मुंबईहून- पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पंतप्रधान मोदी आज करतील आयुष्यमान भारत डिजिटल मिशन लॉन्च,लोकांना हेल्थ आयडी मिळेल