सध्या देशात काही ठिकाणी पावसाचा उद्रेक सुरु असून काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. सध्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडची परिस्थिती पाहता भारतीय हवामान विभागाने दिल्ली, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
येत्या 10 दिवसांत महाराष्ट्रासह उत्तर भारतात जास्त पाऊसाची शक्यता वर्तवली जात आहे. ला निना हवामान पद्धतीमुळे, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला ला निना पॅटर्न विकसित झाल्यामुळे भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. IMD ने म्हटले आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये भारतात सरासरी 422.8 मिमीपेक्षा 106 टक्के जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
1 ते 4 ऑगस्ट दरम्यान कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याबाबत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.