Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रुपाली पाटील यांचे आगीतून फुफाट्यात पडलो असे होणार नाही : अजित पवार

रुपाली पाटील यांचे आगीतून फुफाट्यात पडलो असे होणार नाही : अजित पवार
, गुरूवार, 16 डिसेंबर 2021 (15:29 IST)
मनसेला रामराम केल्यानंतर रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. रुपाली पाटील यांचे आगीतून फुफाट्यात पडलो असे होणार नाही. रुपाली पाटील यांच्या कामाची पद्धत आम्हाला माहिती आहे. त्यांच्या कामामुळे पक्षाला फायदाच होईल तसेच रुपाली पाटील यांनी पक्षाकडून मदत करण्यात येईल असेही अजित पवार म्हणाले आहेत. राष्ट्रवादीमध्ये जाती आणि नात्याचा विचार केला जात नाही तर कामाचा विचार केला जातो असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
 
रुपाली पाटील यांच्या पक्ष प्रवेशाचा जाहीर कार्यक्रम घेऊ तुमच्यावर आगीतून उठून फूफाट्यात पडलो अशी वेळ येऊ देणार नाही. नाउमेद होऊ नका तुमच्या रक्तात ते नाही. पण काळजी करु नका असे अजित पवार म्हणाले. भावाच्या नात्याने सगळी मदत केली जाईल. रुपाली चाकणकर पुढे जात आहेत तसेच रुपाली पाटील पुढे जातील असे अजित पवार म्हणाले आहेत.
 
धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत आणले तेव्हा काय होणार अशी चर्चा सुरु होती. त्यांच्यावर विरोधी पक्षनेत्याची जबबादारी दिली. राष्ट्रवादीत जातीचा, नात्याचा विचार केला जात नाही. राष्ट्रवादीत त्याची प्रतिमा, त्याच्या मागील जनाधार याचा विचार केला जातो. पुणे महानगरपालिकेत तुमच्या सारख्या भगिनींना संधी मिळाली पाहिजे. शहराचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि अधिकाऱ्यांवर चुकीचे काम करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी तुमचे काम राष्ट्रवादीला महत्त्वाची ठरेल अशी ग्वाही देतो. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वतीने सर्वांच्या वतीने राष्ट्रवादीमध्ये रुपाली पाटील यांचे स्वागत करतो. असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फडणवीस यांनी मानले सर्वोच्च न्यायालयाचे आभार