राज्यावर हवेची चक्रीय स्थिती निर्माण होऊन बाष्प येत असल्याने सध्या पूर्वमोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. पुढील चार दिवस सर्वच विभागांत कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला असून, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
मराठवाड्यात १९ ते २२ मार्च दरम्यान पाऊस राहणार आहे. या भागांत पुढील दोन दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात १९ ते २१ मार्च या कालावधीत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता असून, कोकणात २१ आणि २२ मार्चला काही भागांत पावसाचा अंदाज आहे.