Publish Date: Fri, 25 Aug 2023 (10:10 IST)
Updated Date: Fri, 25 Aug 2023 (10:13 IST)
राज्यातील जाळण्यात किरकोळ वादावरून दोन गटात तुफान हाणामारीची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री जालनातील गांधी चमन चौकात हाणामारीची घटना घडली आहे. दोन गट एकमेकांच्या समोर आले आणि एकमेकांना किरकोळ वादावरून लाथाबुक्यांनी मारहाण केली. लोखण्डी रॉड ने मारहाण केली , वाहनांचे काच फोडले, या मारहाणीत काही तरुण जखमी झाले आहे.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर ते घटनास्थळी पोहोचले. पोलिसाना आलेले पाहून या तरुणांनी पळ काढला.
या हाणामारीत काही तरुण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.