जिंदाल पोलिफिल्म कंपनीला भीषण आग लागली आहे. 22 तास उलटून गेले तरी अद्यापही धुराचे लोळ अद्यापही कायम आहे. कंपनीत साधारणपणे 16 स्फोट झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक ते दिल्ली विमानसेवेचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. रविवारी झालेल्या आगीची दाहकता अद्यापही कायम असल्याने विमानसेवेवर याचा परिणाम झाल्याचे दिसून आले. नाशिक विमान तळावरून टेक ऑफ घेणारे अनेक विमानाचा मार्ग बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे, इगतपुरी हद्दीतून हे विमान जाणारे असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. या आगीचे कारण अद्यापही समजू शकले नाही तरी कंपनीत सोळा स्फोट झाले होते. केमिकलचे बॅरल या कंपनीत असल्याने आग अजूनही धुमसत आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगपुरी तालुक्यात लागलेल्या आगीत दोन महिलांचा मृत्यू झाला होता, त्यामध्ये 17 जण जखमी असून तिघे गंभीर जखमी आहे.
नाशिकच्या या आगीचा परिणाम नाशिक ते दिल्ली प्रवास करणाऱ्या विमान सेवेवर झाला, आगीचे कारण संजू शकले नाही तरी स्फोट होत असल्याची माहिती मिळाल्याने विमान सेवेचा मार्ग बदलण्यात आला.
आगीच्या ठिकाणी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन जखमींची रुग्णालयात जाऊन पाहणी केली आहे, यामध्ये मृतांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor