Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 15 April 2025
webdunia

कराची एक दिवस भारतात असेल: फडणवीस

Karachi will be part of India one day
, सोमवार, 23 नोव्हेंबर 2020 (10:12 IST)
कराची स्वीट्सच्या वादावरुन शिवसेनेच्या भूमिकेला टोला लावत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की कराची एक दिवस भारताचा भाग असेल. त्यांनी शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी मुंबईतील कराची स्वीट्स या साखळी बेकरीचं नाव बदलण्याची मागणीवरुन प्रतिक्रिया देत असे म्हटले. फडणवीस म्हणाले, आमचा अखंड भारतावर विश्वास आहे. आम्हाला विश्वास आहे की कराची एक दिवस भारताचा भाग असेल.”
 
मुंबईतील वांद्रे भागात असलेल्या कराची स्वीट्सचं नाव बदलावं कारण कराची पाकिस्तानातील शहर असून भारतात या नावाचं दुकान असल्याने आपल्या जवानांचा अपमान होतो अस नांदगावकर यांनी आपल्या मागणीवर स्पष्टीकरण देताना म्हटलं.
 
दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केल आहे की मुंबईत मागील 60 वर्षांपासून कराची बेकरी आणि कराची स्वीट्स त्यांचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. म्हणून त्यांच नाव बदलण्यास सांगण्यात काहीच तथ्य नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

INDvAUS: रवी शास्त्रींचा विश्वास - टीम इंडियाचा फॅब -5 ऑस्ट्रेलियामध्ये जिंकेल