Ratnagiri News :सोमवारी सकाळी पहाटेच्या सुमारास मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाठलाग करत हुंडाई क्रेटा या पळ काढणाऱ्या संशयित कारचा मधून विदेशी दारू वाहतुकीसह संशयित आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेत 16 लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.
31 डिसेंबर आता काहीच दिवसांवर येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून भरारी पथक गस्त घालत आहे. या विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोवा राज्य बनावट विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यावर या पथकाने रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर एसटी स्थानक समोर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची कसून तपासणी करण्यास सुरु केले असता सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास गोव्याच्या दिशेने येणाऱ्या कारला थांबण्याचा इशारा दिला असता या कारच्या चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने रिव्हर्स गिअर टाकत पळ काढला.
या पथकाने त्या कारचा पाठलाग करण्यास सुरु केले आणि कारला पकडण्यात यश आले. कारचालकाला विदेशी दारूच्या मोठ्या साठासह ताब्यात घेतले आहे. या वाहनामध्ये पथकाला गोवा बनावटी विदेशी दारूचे तब्बल 4 लाखाहून अधिक किमतीच्या 81 पेट्या सापडल्या. या प्रकरणी कार चालकाला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहे.