"देशभरात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत?" अशा आशयाचा प्रश्न विचारत प्रमुख विरोधी पक्षनेत्यांनी मोदींना पत्र लिहिलं आहे. या पत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सहीच नसल्यानं चर्चांना उधाण आलंय.
देशभरात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूलच्या ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मोदींना एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सही नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावर सही केली नाही. या पत्रावर उद्धव ठाकरेंनी सही करावी यासाठी सर्व विरोधी पक्षनेत्यांनी तब्बल सहा तास वाट पाहिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.