अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत राजकुमारी संयु्क्ताराजे जयसिंहराजे भोसले (वय 69 वर्षे) यांचे शुक्रवारी दुपारी चार वाजता हृदयविकाराच्या झटक्याने पुणे येथे निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा आज शनिवारी 5 मे रोजी दुपारी चार वाजता नवीन राजवाड्यापासून शहराच्या प्रमुख मार्गावरून निघणार आहे. त्यांच्या पार्थिव देहावर थडगे मळा (आनंद बाग) येथे सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तत्पूर्वी राजकुारी भोसले यांचे पार्थिव हे शनिवारी सकाळी 9 तेदुपारी 3 पर्यंत अंत्यदर्शनासाठी नवीन राजवाड्यात ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात श्रीमंत राजकुारी सुनीताराजे भोसले ही बहीण तर श्रीमंत राजकुमार मालोजीराजे भोसले (तिसरे) हे (दत्तकपुत्र) असा परिवार आहे. अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीच्या त्या अध्यक्षा होत्या. त्या उच्च विद्याविभूषित होत्या.
संयु्क्तराराजे भोसले यांचा जन्म 5 जानेवारी 1949 रोजी झाला. स्वामी समर्थांच्या त्या निस्सीम भक्त होत्या. अध्यात्माबद्दल त्यांना विशेष आवड होती. परदेश भ्रमण त्यांच्या आवडीचा आणि अभ्यासाचा विषय होता. राजघराण्याच्या परंपरेप्रमाणे स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीदिवशी पहिला अभिषेक देवस्थान आणि समाधी मठात त्यांच्या हस्ते केला जात होता. त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.