महाराष्ट्रातील प्रसद्धि शनिशिंगणापूर मंदिर अखेर राज्यसरकारने ताब्यात घेतलं आहे. याबाबतचे विधेयक विधानसभेत मंजूर झाले असून शनैश्वर देवस्थानावर आता राज्य सरकारचे नियंत्रण राहील.
अहमदनगरमधील या मंदिरात येणार्या भक्तांची संख्या सतत वाढत आहे म्हणून उत्तम व्यवस्थापन व प्रशासन आणण्याबरोबरच चांगल्या दर्जाच्या सोयी पुरवण्यासाठी राज्य सरकारने हे विधेयक आणले. मंदिराच्या काराभारासंबंधी व गैरव्यवस्थापनाबाबत तक्रारी होत्या तसेच महिलांना मंदिराच्या चौथऱ्यावर जाऊन पूजा करण्यास बंदी होती. या सर्वांची राज्य सरकारने दखल घेतली होती. आता मंदिराचा कारभार पारदर्शक होण्याची तसेच भाविकांना दर्जेदार सुविधा मिळण्याची शक्यता आखली जात आहे.