मुंबई- उत्तर प्रदेशातील कर्जमाफीच्या मॉडेलचा अभ्यास करण्याचे आदेश राज्याच्या वित्त सचिवांना दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. राज्य सरकार शेतकर्यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
उत्तर प्रदेश आणि तमिळनाडूनंतर महाराष्ट्रातील शेतकर्यांनाही कर्जमुक्त करावे यासाठी राज्य सरकारावर दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यंमत्री फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिले.
यूपीत कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला. आत त्यांनी हा निर्णय कसा घेतला, यासाठी पैसे कुठून आणणार याचा अभ्यास करण्याचे निर्देश राज्याच्या वित्त सचिवांना दिल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.