Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मांढरदेवी यात्रा रद्द, १३ जानेवारी ते १३ फेब्रुवारीपर्यंत मंदिरही बंद

मांढरदेवी यात्रा रद्द, १३ जानेवारी ते १३ फेब्रुवारीपर्यंत मंदिरही बंद
, गुरूवार, 7 जानेवारी 2021 (08:43 IST)
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी  मांढरदेवी येथील यात्रा रद्द करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यातील २७, २८ व २९ रोजी पौष पौर्णिमेला देवीची मुख्य यात्रा आहे. दरम्यान १३ जानेवारी ते १३ फेब्रुवारीपर्यंत मंदिरही बंद ठेवण्यात येणार आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात दिलेल्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यात्रेतील धार्मिक विधी, पूजाअर्चा रुढी परंपरेनुसार स्थानिक पातळीवरील देवस्थानचे ट्रस्टी, मंदिर पुजारी व ग्रामस्थ अशा मोजक्याच भाविकांनी करण्याच्या सूचना प्रांताधिकारी संगीता राजापूरकर -चौगुले यांनी दिल्या आहेत.
 
मांढरदेव येथील काळुबाई ही महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. महिनाभर देवीचा यात्रोत्सव चालतो. या कालावधीत मांढरगडावर सुमारे सात ते आठ लाख भाविक येत असतात. करोनामुळे यात्रा, जत्रांसह गर्दी होणारे सार्वजनिक उत्सव रद्द करण्यात आले आहेत. १३ जानेवारी ते १३ फेब्रुवारी हा संपूर्ण पौष महिना दर्शनासाठी मंदिर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. दरवर्षी यात्रेसाठी बाहेरगावाहून येणारे व्यावसायिक मांढरदेव गावात येणार नाहीत.  मांढरदेवसह परिसरातील यात्रा निमित्ताने पाहुण्यांना बोलावू नये याही दृष्टीने दुकानदार व परिसरातील सर्व गावातील ग्रामस्थांनी व मांढरदेव ग्रामस्थांनी काळजी घ्यावयाची आहे, अशा सूचना यावेळी प्रांताधिकारी यांच्यामार्फत देण्यात आल्या. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोठा निर्णय, औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण