मराठा समाजासाठी मराठा आरक्षणची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यात अंतरवली सराटी येथे सभा घेतल्यावर आता मनोज जरांगे पाटीलांची सभा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात राजगुरूनगर येथे 20 ऑक्टोबर शुक्रवारी होणार आहे. आयोजकांनी सभेची जय्यत तयारी सुरु केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी अंतरवली सराटी येथे मराठा समाजाची सभा घेतली त्यातून त्यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणाबाबत 10 दिवसांत निर्णय घेण्याची मुदत दिली आहे. आता राज्य सरकारकडे दहा दिवस उरले आहेत. त्यांनी या दहा दिवसात मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा. अन्यथा त्यांनतर 22 ऑक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल. पुढे जे काही होईल त्याला जबाबदार सरकार असेल असा इशारा दिला आहे. आता शुक्रवारी पुढील सभेत काय होते त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.