कोल्हापूर लडाख मध्ये जवानांच्या गाडीला झालेल्या अपघातामध्ये महाराष्ट्रातील ७ जवान हुतात्मा झाले तर २ जवानांना वीरमरण प्राप्त झाले होते. त्यापैकी गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे गावचे सुपुत्र प्रशांत जाधव यांच्या अंत्यसंस्काराची तयारी त्यांच्या बसर्गे या गावी करण्यात येत आहे.
लडाख मध्ये झालेल्या या अपघातांमध्ये महाराष्ट्रातील २ जवानांमध्ये बसर्गे येथील प्रशांत जाधव यांच्या निधनामुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. ग्रामपंचायत कडून प्रशांत जाधव यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात येत आहे. जाधव यांच्या कुटुंबातील आतापर्यंत ९ जण भारतीय सैन्य दलात आजपर्यंत सेवा करत होते.
काही दिवसांपूर्वीच आपली सुट्टी संपवून शहीद प्रशांत जाधव पुन्हा सेवेत दाखल झाले होते. जवान प्रशांत जाधव यांचे निधन झाल्यामुळे ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे. गावातीलच जयसिंग घाटगे हायस्कूलच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती गावचे ग्रामस्थ बाळेश नाईक आणि गणपत थोरात यांनी दिली आहे.