Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुन्हा आनंदायक भविष्यवाणी, आठवड्यात येणार मान्सून देशात

पुन्हा आनंदायक भविष्यवाणी, आठवड्यात येणार मान्सून देशात
मान्सूनची अनिश्चितता अखेर संपुष्टात येईल असे चित्र आहे. पुढील 72 तासात मान्सूनचं केरळात आगमन होईल असा पुन्हा हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 
 
जवळपास 6 ते 7 तारखेला मान्सून केरळात दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज व्यक्त केला आहे. अरबी समुद्रात मान्सूनसाठी वाऱ्याची अनुकूलता निर्माण झाली असून सोबत आता ढगही जमा होत आहेत. 
 
मान्सून केरळात दाखल झाल्यावर साधारण सहा दिवसात राज्यात येतो, त्यामुळे 12 तारखेला राज्यात मान्सून आपली हजेरी अलावणार असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.  मात्र वातावरण अनुकूल असल्यास त्यापूर्वीही पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर येत्या 38 तासांत विदर्भातील उष्णतेची लाट कमी होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज व्यक्त केला आहे. 
 
देशात यंदा 96 टक्के म्हणजे सामान्य पावसाचा अंदाज आहे. राज्यात यंदा कमी पावसाची शक्यता होती. मात्र सध्याची मान्सूनची अनुकूल परिस्थिती पाहता राज्यात यंदा 100 टक्के पाऊस पडेल असे चित्र आहे. जर पाऊस उत्तम झाला तर शेतकरी राजाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पंकजा ताई मुंढे यांच्या जिल्ह्यात जेसीबी विवाहितेच्या जीवाशी, हुंड्यासाठी हत्या