Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

यंदा मान्सून लवकर धडकणार; सध्या देशात सर्वत्र उष्णतेची तीव्र लाट आलेली आहे

Webdunia
शुक्रवार, 13 मे 2022 (08:02 IST)
भारतात या वर्षी मान्सून लवकर दाखल होणार असून, त्यामुळे लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. एप्रिल 2022 मध्ये देशाचा उत्तरेकडील भाग आणि पश्चिम भागांमध्ये तीव्र उष्णतेची लाट (Heat Wave) आली होती, परंतु आता 15 मे पर्यंत मान्सून अंदमानमध्ये दाखल होईल अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे मान्सून लवकरच देशाच्या इतर भागातही पोहोचण्याची शक्यता आहे. 
 
हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून यावेळी लवकरच अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होऊ शकतो. 15 मे रोजी या मान्सूनचा पहिला पाऊस पडू शकतो. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, यावेळी नैऋत्य मान्सून दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागराच्या परिसरात 15 मेच्या सुमारास पोहोचू शकतो.
 
हवामानशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार केरळमध्ये मान्सून सुरू होण्यासाठी, तसंच उत्तरेकडे जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. कारण एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच देशातील बहुतांश भागांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. पुढील पाच दिवस अंदमान आणि निकोबार बेटांवर हलका-मध्यम पाऊस पडू शकतो, असं हवामान खात्याचं म्हणणं आहे.
 
अंदमान आणि निकोबार बेटांवर, 14 मे ते 16 मे पर्यंत वेगवेगळ्या भागात पाऊस पडू शकतो. यासोबतच ताशी 40-50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता आहे. 15-16 मे रोजी दक्षिण अंदमान समुद्रातही जोरदार वारे वाहू शकतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

पुढील लेख
Show comments