Publish Date: Mon, 26 Mar 2018 (10:54 IST)
Updated Date: Mon, 26 Mar 2018 (11:00 IST)
मोर्चा वरून आता आंबेडकर विरुद्ध सरकार असे चित्र तयार झाले आहे. त्यामुळे आता तणाव निर्माण होणार नाही याची खबरदारी सरकार ने घेतली पाहिजे अशी झाली आहे. मुंबईत संभाजी भिडेंच्या अटकेच्या मागणीसाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. केवळ आंदोलन करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी मोर्चा काढण्यावर ठाम असल्याची भूमिका मांडली आहे. मोर्चासाठी राज्यभरातून लोकं मुंबईकडे रवाना झाले आहेत परवानगीबाबत सरकारं आधीच कळवायला हवं होतं. त्यामुळे उद्या भायखळा ते आझाद मैदान मोर्चा निघणारच असा निर्धार आंबेडकरांनी व्यक्त केला आहे. मात्र उद्या गोंधळ निर्माण झाला तर त्याला सरकार जबाबदार असल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी सागितले आहे. कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी एकबोटेंपाठोपाठ संभाजी भिडेंनाही अटक करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेते हे पाहणे गरजेचे आहे.