महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा या अभियानासाठी सांगलीची कन्या व भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्मृती मानधना, हास्य सम्राट अजितकुमार कोष्टी आणि प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन व माधवी पटवर्धन दाम्पत्याची ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड करण्यात आली. आयुक्त नितीन कापडणीस यांनी याबाबतची घोषणा केली.
ब्रँड अँबेसिडर अजितकुमार कोष्टी यांनी स्वच्छ सर्व्हेक्षण आणि माझी वसुंधरा मध्ये महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. मनपा आयुक्त कापडणीस यांच्याहस्ते ब्रँड अँबेसिडरांचा यांचा सत्कार करण्यात आला.