Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लातुरातील ’स्टेप बाय स्टेप’क्लासचे संचालक चव्हाण यांची हत्या सुपारी देवून

लातुरातील ’स्टेप बाय स्टेप’क्लासचे संचालक चव्हाण यांची हत्या सुपारी देवून
, मंगळवार, 26 जून 2018 (15:22 IST)
लातूर येथील क्लासचालक ’स्टेप बाय स्टेप’क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांची हत्या कोणी केली हे समोर आले आहे. त्यांचा पूर्वीचा बिहारी पार्टनर ने सुपारी देवून यांची हत्या करवली आहे. ही हत्या त्याने क्लासच्या वादातून केली आहे हे स्पष्ट झाले आहे. मुख्य आरोपी चंदनकुमार शर्मा हा मूळचा बिहारमधील असून, गेल्या अनेक वर्षांपासून लातूर येथे राहत आहे. बी मॅक झालेला चंदनकुमार हा ‘कुमार मॅथ्स’ नावाने क्लास चालवत होता. या क्लासमध्ये जेव्हा चव्हाण शिकवायला येवू लागले तेव्हा विद्यार्थी संख्या अनेक पटींनी वाढली. मात्र पुढे आपला वेगळा मार्ग म्हणून चव्हाण यांनी त्यांचा वेगळा क्लास सुरु केला होता. यामुळे बिहारी कुमारला मोठा फटका बसला होता. याचा राग त्याने मनात ठेवत चव्हाण यांच्या हत्येची २० लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यातून चव्हाण यांचा खून झाला आहे. चंदनकुमार शर्मा याने महेशचंद्र गोगडे रेड्डी याला अविनाश चव्हाण यांच्या हत्येची सुपारी दिली. महेशचंद्रने शरद घुमे याला हे काम सोपवले. शरद घुमेने त्याच्या गावात राहणाऱ्या करण सिंग घहीरवाल याला सोबत घेतले आणि अविनाश चव्हाणांवर गोळीबार केला आहे. लातुरातील प्रसिद्ध अशा ‘स्टेप बाय स्टेप’क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांची 24 जूनच्या रात्री हत्या झाली. आपल्या घराकडे जात असताना शिवाजी शाळेजवळ त्यांच्या गाडीवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. यात एक गोळी त्याच्या उजव्या छातीत लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. लातूर शहरात सुमारे 100 शिकवण्या सुरु झाल्या आहेत. नियमित आणि पुन्हा परीक्षा देणारे असे 25 हजार विद्यार्थी या शहरात शिकतात. तीन विषयांसाठी मिळून प्रत्येक विद्यार्थ्याला 50 हजार फिस द्यावी लागते. त्यातून सुमारे 1200 कोटींचा व्यवहार या जिल्ह्यात होतो आहे. हा क्लासचा आर्थिक वाद किती मोठा आहे हे दिसून येते आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हायकोर्टाने चिकनवरून झापले सरकारला, वजन वाढवण्यासाठी बाजारात इंजेक्शनचा वापर