Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नागपूर : रत्नागिरीचा तहसीलदार असल्याचे सांगून महिलेला लुटले

नागपूर : रत्नागिरीचा तहसीलदार असल्याचे सांगून महिलेला लुटले
, बुधवार, 17 मे 2023 (08:13 IST)
रत्नागिरीचा तहसीलदार असल्याची बतावणी करून नागपूर येथील महिलेची 70 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा पकार समोर आला आह़े सुभाष जगन्नाथ गणवीर उर्प सुभाष वानखेडे (ऱा नालंदानगर, नागपूर) असे संशयिताचे नाव आह़े वाईन शॉपचा परवाना मिळवून देतो, असे सांगून सुभाष याने महिलेकडून सुमारे 70 लाख रूपये उकळल़े
 
संध्या अशोक पुण्यानी (56, रा. जयराम कॉलनी, बेलतरोडी) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आह़े त्यांच्या फिर्यादीवरून, बेलतरोडी पोलिसांनी सुभाष याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केल़ा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तकारदार संध्या यांचा पती अशोक धाग्यांचा व्यापार करत होत़ा 2011 साली संध्या व तिचा पती यांची ओळख झाली होत़ी दरम्यान 2015 मध्ये आजारपणाने संध्या यांच्या पतीचे निधन झाले. आपण रत्नागिरीत तहसीलदार म्हणून काम करतो, असे सुभाषने त्यांना सांगितले होते. अनेकदा त्याला घरी जावे लागे, म्हणूनच त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. संध्याचा मुलगा रौनकचा अपघात झाला आणि त्याच्या मेंदूचे ऑपरेशन झाले. त्याचा अभ्यास थांबला होता. सुभाषने त्याला हवे असल्यास दारू दुकानाचा परवाना मिळू शकतो, असे सांगितले. यामुळे मुलाचे भविष्य घडेल. सुभाषने सांगितले होते की, त्यांच्याकडे दारू दुकानाचा परवानाही आहे, पण सरकारी कर्मचारी असल्याने तो दुकान उघडू शकत नाही, अशी बतावणी सुभाष याने संध्या यांना केल़ी परवान्याचे नूतनीकरण करून घेण्यासाठी त्याने संध्याच्या पतीकडे 16 लाख रुपयांची मागणी केली. नंतर तो परवाना त्यांच्या नावावर करून घेण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून सुभाष त्यांच्याकडून मोठी रक्कम घेत होता.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक : गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमातील गोंधळाची परंपरा कायम दोन फोटोग्राफला चोपले