Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Nashik : नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधींचा गंडा

cyber halla
, सोमवार, 11 डिसेंबर 2023 (17:31 IST)
सध्या सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सायबर फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहे. उच्चशिक्षित लोक देखील या फसवेगिरीला बळी पडत आहे. नोकरीच्या आमिषाने फसवणूक केली जात आहे. नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 4 कोटी रुपयांचा गंडा लावला आहे. 

कोरोनाच्या काळापासून गुन्हेगिरीच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कधी आधार लिंक करण्यावरुन तर कधी केवायसी अपडेट करण्यावरून लोकांची फसवणूक केली जात आहे. आता नाशिककरांना 4 कोटी रुपयांहून अधिकचा गंडा घातला आहे. नोकरी मिळवण्याचे आमिष दाखवून एखाद्या वेबसाईट वर क्लिक करायला सांगतात आणि त्यावर तरुण -तरुणीला काही ठराविक रकम देण्यास सांगतात. रकम दिल्यावर प्री-पेड टास्क दिला जातो. त्यात विमानाचे तिकीट बुकिंग करणे, परकीय चलन बदल, सोशल मीडियावर व्ह्यूज वाढवणे, क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार, करणे असे कामे वर्क फ्रॉम होम ने दिले जातात.

या साठी काही रक्कम घेता नंतर ही रक्कम वाढीव पगारासह खात्यात जमा करणार असे सांगून  पुढे कोणतेही काम दिले जात नाही आणि हे काम बंद होते. संपर्क करणाऱ्या व्यक्तीची माहिती नसल्याने त्या व्यक्तीशी संपर्क होऊ शकत नाही आणि फसवणूक झाल्याचे समजते. नंतर दिलेल्या अकाउंट नंबर ने सायबर गुन्हेगार पैसे काढूनबंकचे खाते रिकामे करून  फसवणूक करतात. नंतर फोन केल्यावर किंवा लिंकवर क्लिक केल्यावर हे बंद असल्याचे समजते आणि पोलिसांना देखील या गुन्हेगारांना शोधणे कठीण जाते.  

Edited by - Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आधी स्वतःला वाहिली श्रद्धांजली, नंतर तरुणाने केली आत्महत्या