Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 3 April 2025
webdunia

जाता जाता आयुक्त दीपक पाण्डेय यांनी घेतला हा मोठा निर्णय

Nasik: Helmet compulsion
, शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (08:05 IST)
नाशिकच्या पोलिस आयुक्त पदावरुन बदली होताच आणि नव्या आयुक्तांनी पदभार स्विकारण्यापूर्वी दीपक पाण्डेय यांनी महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. आयुक्त पाण्डेय हे विविध कारणामुळे सतत चर्चेत होते. त्यांच्या कारभाराची चर्चा राज्यभरातच होत होती. खासकरुन त्यांचा लेटरबॉम्ब आणि हेल्मेट सक्ती यांचा प्रामुख्याने समावेश होता. मात्र, जाता जाता त्यांनी महत्त्वाचा निर्णय घेऊन सुखद दिलासा दिला आहे.
 
नाशिकमध्ये दुचाकीवरील दोघांना हेल्मेट सक्तीचा निर्णय पाण्डेय यांनी घेतला. तसेच, हेल्मेटशिवाय दुचाकी चालकांना पेट्रोल देऊ नये. तरीही दिल्यास पंप चालकांवर कारवाईचा फतवा पाण्डेय यांनी घेतला. त्यास मोठा विरोध झाला. अखेर नाशिक पेट्रोल डिलर्स असोसिएशनने ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी संप पुकारला. त्यामुळे ही बाब राज्यभरात चर्चिली गेली. त्यानंतरही पाण्डेय यांनी भूमिका कायम ठेवली आणि नाशकातील काही पंपचालकांना थेट कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. विशेष म्हणजे, या नोटिसा थेट परवाना रद्द का करु नये, अशा स्वरुपाच्या होत्या. यामुळे पंपचालकांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण होते. अखेर जाता जाता पाण्डेय यांनी पंपचालकांना दिलासा दिला आहे. तशी माहिती नाशिक डिस्ट्रिक्ट पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनचे भूषण भोसले यांनी दिली आहे. पाण्डेय यांनी पालिजा पेट्रोलियम, खालसा पेट्रोलियम आणि एन एल गांधी पेट्रोलियम या ३ पंप चालकांना लायसन्स रद्द करण्याची करणे दाखवा नोटीस बजावली होती. असोसिएशनने उच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत विनंती अर्ज केला होता. त्याची दखल घेत पाण्डेय यांनी त्यांच्या कारणे दाखवा नोटिस मागे घेतल्या तसेच रद्दही केल्या आहेत. सर्व पंपचालकांची एकजूटीमुळेच हे घडल्याचे भोसले यांनी म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रातील लोड शेडिंगबाबत ऊर्जामंत्री राऊत यांनी केली ही मोठी घोषणा