राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी वादग्रस्त विधान केल्याचं समोर आलं आहे. मलिक यांनी भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर वादग्रस्त भाषेत विधान केलं आहे. नांदेड येथे बोलताना नवाब मलि म्हणाले, “चित्रपट जशी चालवण्यासाठी आयटम गर्लची गरज लागते. मला वाटतं राजकीय क्षेत्रामध्ये किरीट सोमय्या भाजपाच्या आयटम गर्ल सारखे राजकारण करत आहेत. बातमी कशी होईल त्यासाठी आयटर्म गर्लचा कार्यक्रम सुरु आहे,” असं ते म्हणाले.
मलिक यांच्या या वादग्रस्त टीकेचे राजकीय पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. तर, मलिक यांनी ही टीका केल्याने आता त्यावर किरीट सोमय्या काय प्रतिक्रिया देतात याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागलं आहे.