Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उदयनराजेंच्या ताफ्यात नव्या BMW 007 ची ‘एन्ट्री’

उदयनराजेंच्या ताफ्यात नव्या BMW 007 ची ‘एन्ट्री’
, गुरूवार, 14 ऑक्टोबर 2021 (15:27 IST)
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले चे काही गोष्टींचे शौक निराळेच आहेत. त्यांनी बुधवारी पुण्यातून (Pune) नवीन बीएमडब्ल्यू गाडी विकत घेतली आहे. पुण्यातील बवेरीयन मोटर्स प्रा. लि. येथून त्यांनी BMW TEX 5 ही गाडी विकत घेतली. उदयनराजे भोसले यांनी या नव्या गाडीचा नंबर देखील नेहमीप्रमाणे जेम्स बॉन्ड ( नंबरशी निगडीत 007 घेतला आहे.
 
उदयनराजे भोसले यांना गाड्यांचे प्रचंड वेड आहे.त्यांच्याकडे प्रत्येक गाड्यांचा एक इतिहास झाला असे म्हणायला काही हरकत नाही.उदयनराजे यांनी त्यांच्या जीवनात कमी वयात पहिल्यांदा वाहन खरेदी केले ते जिप्सी (Gypsy), त्यानंतर महिंद्रा कंपनीची त्यावेळची थार गाडी खरेदी केली.याच्यानंतर टाटा सियार, टाटा इस्टेट (Tata Estate), स्कार्पिओ (Scorpio), मर्सडिज (Mercedes), ऑडी (Audi), सफारी, पजेरो (Pajero) अशा अनेक गाड्या त्यांच्या ताफ्यात एकामागून एक जमा झाल्या.सध्या त्यांच्याकडे फोर्ड इंडीवर MH 11 AB 007 ही गाडी होती.त्यानंतर त्यांनी आता बीएमडब्ल्यू कंपनीची TEX 5 ही आज पुण्यातून खरेदी केली.
 
उदयनराजे भोसले  महाविद्यालयात असताना त्यांचा जास्त ओढा राजकारणापेक्षा वाहनांकडे आणि रेसिंगमध्ये अधिक होता. त्यांचे शिक्षण परदेशात ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मधून झाले. तसेच लंडनमधून त्यांनी एमबीए (MBA)  देखील केले आहे. या कालावधीत त्यांना छंद जडला तो रेसिंगचा . लंडन (, फ्रान्स , जर्मनी  या देशात ते कायमच रेसिंगच्या ट्रॅकवर दिसले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

CS च्या परीक्षेत पुण्याची वैष्णवी बियाणी देशात प्रथम