Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल कुठलीही चर्चा झाली नाही : जयंत पाटील

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल कुठलीही चर्चा झाली नाही : जयंत पाटील
, शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (07:23 IST)
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. या विषयावर माध्यमांशी बोलताना राज्य सरकारमधील वरिष्ठ मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल कुठलीही चर्चा झाली नाही असे सांगितले.
 
“धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल केलं जात होतं. त्या संदर्भात त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी योग्य ती पावलं उचलावी एवढी अपेक्षा होती, पण ती पावलं उचलली गेली नाहीत, त्यामुळे धनंजय मुंडे हायकोर्टात गेले” असे जयंत पाटील यांनी सांगितले.
 
“पोलिसांना तपास करुं दे. त्यातून योग्य तो निष्कर्ष निघेल. आपण निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची घाई करु नये. पोलीस योग्य ती पावले उचलतील. आम्ही पोलिसांच्या तपासात हस्तक्षेप करणार नाही” असे जयंत पाटील यांनी सांगितले.
 
“या प्रकरणात एक महिला वाट्टेल ते आरोप करुन, राजकीय व्यक्तीमत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतेय. त्याची योग्य ती दखल आपण घ्याल” असा विश्वास जंयत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केंद्र सरकारने टोपे यांचा 'तो' आरोप फेटाळला