Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कॉंग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र ओबीसी विभागाचे एक दिवसीय मंथन शिबिर 18 सप्टेंबरला......

कॉंग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र ओबीसी विभागाचे एक दिवसीय मंथन शिबिर 18 सप्टेंबरला......
, सोमवार, 5 सप्टेंबर 2022 (09:25 IST)
नाशिक: कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाला बळकटीकरण करण्यासाठी राज्यभरात विभागवार एक दिवसीय मंथन शिबिराचे नियोजन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस ओबीसी करत आहे.या माध्यमातून ओबीसींचे प्रश्न ,राजकारणातील ओबीसींचे स्थान, सरकारकडून वेळोवेळी ओबीसींवर होणारे अन्याय या संदर्भात विचारविनिमय करण्याबरोबर ओबीसी पदाधिकार्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.   
 
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे एक दिवसीय मंथन शिबिर 18 सप्टेंबर 2022 रोजी नाशिक येथील धनलक्ष्मी बँक्वेट हॉल औरंगाबाद रोड पंचवटी नाशिक येथे होणार आहे.
 
काँग्रेस पक्षाचे महागाई  विरोधात देशव्यापी हल्लाबोल आंदोलन दिल्ली येथे ४ सप्टेंबर २०२२ झाले असून या निमित्ताने ओबीसी विभागाचे राज्यातील अनेक पदाधिकारी दिल्लीत उपस्थित होते.आंदोलनानंतर 24,अकबर रोड येथील कॉंग्रेस कार्यालय येथे ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री कॅप्टन अजय सिंग जी यादव यांची भेट घेऊन त्यांना विभागीय मंथन शिबिराची माहिती देण्यात आली असून त्यांनी १७ सप्टेंबर रोजी पुणे येथे व 18 सप्टेंबर रोजी नाशिक येथे विभागीय शिबिरांना उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी पदाधिकार्यांना सांगितले. याशिवाय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब पटोले, राज्यसभा खासदार मुकुल वासनिक यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहे.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी,उत्तर महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष विजय राऊत,महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद चित्ते,अशोक माळोदे,अनिल माळोदे,अजय तायडे उपस्थित होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Mother Teresa's death anniversary : मदर तेरेसा पुण्यतिथी